गोरेगाव (रायगड) येथे मांसासाठी गोवंशियांची अवैध हत्या करणार्या धर्मांधांना अटक
गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही त्याला भीक न घालता नियमांना पायदळी तुडवणार्या धर्मांधांना कठोर शासन केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे मांसाच्या विक्रीसाठी गोवंशियांची अवैध हत्या केल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अब्दुल कुरेशी आणि वजीर पोटे या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी ९ जणांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे गोरक्षक श्री. निखील दरेकर यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार २३ फेब्रुवारीच्या रात्री पुरार मशिदीच्या मागे १३-१४ गोवंशीय बांधलेल्या स्थितीत आढळले. त्यांची हत्या करण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती गोरक्षक निखील दरेकर यांनी पोलिसांना कळवली. माहितीच्या आधारे पोलिसांनी पहाटे ३ वाजता तेथे धाड टाकली. त्या ठिकाणी पोलिसांनी अब्दुल कुरेशी याला अटक केली. उर्वरित ४ जण पळून गेले. अब्दुल कुरेशी याने त्या ठिकाणी मांसासाठी गोवंशियांची हत्या करण्यात येत असल्याची स्वीकृती दिली. वजीर पोटे हा त्या जागेचा मालक असून त्याने त्या ठिकाणी गोवंशियांना कापण्याची अनुमती दिली होती. त्या ठिकाणी आणि बाजूला उभ्या करण्यात आलेल्या गाडीमध्ये पोलिसांना गोवंशियांचे मांस आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी असलेली गाडी कह्यात घेतली आहे.