देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी नंदुरबार येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन
नंदुरबार – देहली आणि केरळ यांसह देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी, तसेच दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून सखोल अन्वेषण केले जावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने भारताचे केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे केली आहे. याविषयीचे निवेदन ५ मार्च या दिवशी येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सतीश बागुल, राहुल मराठे, आकाश गावित, सुमित परदेशी, जितेंद्र मराठे आणि पंकज जोशी उपस्थित होते.