तृणमूल काँग्रेसच्या धर्मांध नेत्याच्या समर्थकांकडून पक्षाच्या कार्यालयाची जाळपोळ !
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने कार्यकर्ते संतप्त !
अन्य एका धर्मांध नेत्याला तिकिट नाकारल्याने समर्थकांकडून रस्ता बंद आंदोलन !
लोकशाहीला अपकीर्त करणारे तृणमूल काँग्रेसचे धर्मांध नेते ! तिकीट नाकारल्याने हिंसाचार होण्यास उत्तरदायी असणारे नेते लोकप्रतिनिधी झाल्यास काय करतील, याची कल्पना येते ! यांच्या विरोधात निधर्मीवादी बोलतील का ?
कोलकाता (बंगाल) – येथील विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली आहे. तृणमूल काँग्रेसने त्याच्या उमेदवारांची सूची घोषित केली आहे. यामध्ये दक्षिण २४ परगणामधील भानगर भागातील इच्छुक नेते अराबूल इस्लाम यांना तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांनी सामाजिक माध्यमांतून निषेध केला, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्याच कार्यालयाची जाळपोळ केली. येथील नेतनहाटमधील कार्यालयात ही जाळपोळ करून इस्लाम यांच्या समर्थकांनी रस्ता बंद केला. याच प्रकारे २ वेळा आमदार राहिलेले रफिकुर रहमान यांनाही तिकीट नाकारल्याने त्यांच्या कार्याकर्त्यांनी उत्तर २४ परगणामधील राष्ट्रीय महामार्ग २४ अडवून धरला. तब्बल २ घंटे राष्ट्रीय महामार्ग जाम राहिल्यानंतर शेवटी सुरक्षायंत्रणांनी आंदोलकांना बाजूला करून रस्ता पुन्हा मोकळा केला.
४ वेळा आमदार राहिलेले सतगचिया आणि सोनाली गुहा यांनाही तिकिटे नाकारण्यात आली. यानंतर सोनाली गुहा यांनी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे घोषित केले. (४ वेळा आमदार राहिल्यानंतरही त्याची हाव न सुटलेले असे नेते जनतेला कधीतरी त्याग शिकवू शकतील
का ? – संपादक)