(म्हणे) ‘मत दिले नाही, तर पाणी आणि वीज मिळणार नाही !’
बंगालचे कृषीमंत्री तपन दासगुप्ता यांची मतदारांना धमकी
बंगालमधील मंत्री अशा प्रकारची धमकी देतात, याचा अर्थ तेथे तृणमूल काँग्रेसची हुकूमशाही आहे, हे लक्षात येते ! याविरोधात लोकशाहीचे तथाकथित पुरस्कर्ते असणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी पक्ष, संघटना, बुद्धीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
हुगळी (बंगाल) – ज्या भागात मला मते मिळणार नाहीत, त्या भागातील लोकांना पाणी आणि वीज मिळणार नाही, अशी धमकी बंगालचे कृषीमंत्री तपन दासगुप्ता यांनी येथील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रसारसभेमध्ये जनतेला दिली.
Bengal minister warns ‘no water or electricity if not voted to power’; stirs controversy https://t.co/W7TDpiVO4S
— Republic (@republic) March 7, 2021
निवडणुकीच्या पूर्वी तृणमूल काँग्रेसचे आमदार हमीदुल रहमाहुन यांनी जाहीर सभेत, ‘निवडणुकीनंतर विश्वासघात करणार्यांवर कारवाई केली जाईल’, अशी धमकी दिली होती. ‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारी लाभाचा आनंद लुटल्यानंतरही विश्वासघात करणारे लोक देशद्रोही म्हणून गणले जातील’, असे त्यांनी म्हटले होते.