धर्मशिक्षणाविषयीच्या फलक-लिखाणाची सेवा करतांना आलेला कटू अनुभव आणि आलेली अनुभूती !

१. अनुमती घेऊन फलक-लिखाण करूनही एकाने निनावी भ्रमणभाष करून ‘तुम्ही न विचारता कसे काय लिहिता ?’, असे विचारणे

‘एकदा आम्ही धर्मशिक्षणाविषयीच्या फलक लिखाणाची सेवा करायला गेलो होतो. फलक लिखाण केल्यावर त्याखाली संपर्क क्रमांक लिहिलेला असतो. आम्ही लिहिलेल्या भ्रमणभाष क्रमांकावर एक निनावी भ्रमणभाष आला. निनावी भ्रमणभाष करणार्‍याने विचारले, ‘‘तुम्ही न विचारता कसे काय लिहिता ?’’ त्या वेळी मी त्यांना सांगितले की, आम्ही नेहमी अनुमती घेऊनच लिखाण करतो आणि तेव्हाही तसेच केले होते.

२. दुसर्‍या ठिकाणी वसाहतीच्या अध्यक्षांना वरील प्रसंग सांगणे, फलक लिखाण पूर्ण होईपर्यंत त्यांनी स्वतः तेथे थांबणे आणि फलकावर लिहिलेली माहिती आवडल्याने त्यांनी ‘आपण याचे चलत्चित्र (व्हिडिओ) करून ‘सोशल मीडिया’वर प्रसिद्ध करूया’, असे सांगणे

१४.८.२०१९ या दिवशी आम्ही एका वसाहतीच्या अध्यक्षांना फलक लिखाण करण्याविषयी विचारले. तेव्हा त्यांनी अनुमती दिली. आम्ही त्यांना वरील प्रसंग सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही लिहा. मी येथे थांबतो.’’ फलक लिखाण होईपर्यंत ते तेथेच थांबून राहिले. फलकावर लिहिलेली माहिती वाचून ते म्हणाले, ‘‘एवढी छान माहिती लिहिली आहे. आपण याचे चलत्चित्र (व्हिडिओ) करून ‘सोशल मीडिया’वर प्रसिद्ध करूया.’’

‘गुरुदेवा, मला ही अनुभूती तुमच्या कृपेनेच आली आणि हे लिखाण तुमच्या कृपेमुळेच मी करू शकले’, यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. जयश्री कांबळे, जिल्हा सोलापूर (२३.८.२०१९)