मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा नोंद !
चोराच्या उलट्या बोंबा ! हज हाऊसमध्ये देशद्रोही कारवाया होत असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले असतांना कोणी ही वस्तूस्थिती उघड करत असेल तर ते चूक कसे ?
पुणे, ६ मार्च – कोंढवा हे मिनी पाकिस्तान आहे. तेथे हज हाऊस बांधण्यात येणार आहे. येथे अतिरेक्यांचा ‘स्लीपर सेल’ आहे. यामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे वक्तव्य करणार्या समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी तक्रार दिली आहे. राष्ट्रीय एकात्मतेला बाधक आणि कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे वक्तव्य करून एका विशिष्ट धर्माविरुद्ध बदनामी केल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती अधिवक्ता तोसिफ शेख यांनी दिली आहे.
याविषयी मिलिंद एकबोटे म्हणाले, ‘‘हज हाऊस बनवण्याचे काम पुणे महानगरपालिकेने चालू केले आहे. ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. पुणेकरांची सुरक्षा धोक्यात येईल, असा निर्णय पालिकेने घेतला. जनतेच्या विकासासाठी जो पैसा व्यय होणे अपेक्षित आहे, तो पैसा हज हाऊसच्या बांधकामासाठी व्यय करायचा ठरवलेला आहे. हज हाऊससाठी ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ‘मिनिटी स्पेस’मध्ये सांस्कृतिक केंद्राच्या नावाखाली हज हाऊसचे बांधकाम करण्याची पळवाट आयुक्तांनी शोधली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सांगण्यानुसार प्रशासनाच्या मान्यतेविना धार्मिक स्थळाचे बांधकाम करता येत नाही; परंतु सांस्कृतिक केंद्र म्हणून मान्यता घेऊन धूळफेक करून पालिका प्रशासनाने न्यायालयाचा अवमान केला आहे. समस्त हिंदू आघाडी स्वतःची शक्ती पणाला लावून महानगरपालिका प्रशासनाचा हज हाऊस निर्मितीचा मनसुबा यशस्वी होऊ देणार नाही.’’