‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा डिसेंबर २०२० मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा
१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा
१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्यांची संख्या (डिसेंबर २०२०)
१ आ. विविध माध्यमांतील सदस्यांची संख्या (डिसेंबर २०२० पर्यंतची)
१ इ. ‘ऑनलाईन’ प्रसार : २२ सहस्र ४४२ लोकांनी ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘यू ट्यूब’ आणि ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.
२. संकेतस्थळावरील लेख जगातील १३ भाषांमध्ये !
डिसेंबर २०२० मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्’च्या संकेतस्थळावर तमिळ, हिंदी, नेपाळी, इटालियन, रशियन, स्पॅनिश, इंडोनेशियन, चिनी, फ्रेंच, जर्मन, क्रोएशियन, बल्गेरियन आणि हंगेरियन या १३ भाषांमधील एकूण ५६ लेख ठेवण्यात आले.
३. ‘लॉग-इन’ सुविधा
३ अ. ‘एस्.एस्.आर्.एफ्. अब्रॉड लॉग-इन’ सुविधा : या सुविधेच्या अंतर्गत डिसेंबर २०२० मध्ये इंग्रजी, फ्रेंच, सर्बियन, जर्मन आणि स्पॅनिश या ५ भाषांतील वाचकांच्या १०३ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. या मासात संपर्कात आलेल्या ४ नवीन जिज्ञासूंनी नामजपादी उपाय चालू केले आहेत.
३ आ. ‘एस्.एस्.आर्.एफ्. भारत लॉग-इन’ सुविधा : या अंतर्गत डिसेंबर २०२० मध्ये एकूण ६० प्रश्नांना उत्तरे देण्यात आली.
या दोन्ही सुविधांच्या अंतर्गत डिसेंबर २०२० मध्ये एकूण १६३ प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.
४. ‘लाइव्ह चॅट’ (संकेतस्थळाला भेट देणार्या जिज्ञासूंशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान)
याद्वारे हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, जर्मन, सर्बो-क्रोएशियन, फ्रेंच आणि रशियन या ७ भाषांतील १ सहस्र ६२२ वाचकांशी संवाद साधता आला. या माध्यमातून संपर्कात आलेले बरेच जिज्ञासू ‘लाईव्ह स्ट्रीम’ कार्यक्रमांना येत असून काही जिज्ञासू सत्संगांना उपस्थित रहात आहेत.
५. विविध देशांत घेण्यात आलेली ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून झालेला व्यापक प्रसार अन् त्यांना जिज्ञासूंचा मिळालेला प्रतिसाद !
डिसेंबर २०२० मध्ये अमेरिका आणि कॅनडा येथे इंग्रजी भाषेत; क्रोएशिया, सर्बिया आणि मॅसेडोनिया येथे सर्बियन अन् क्रोएशियन या भाषांत; जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड येथे जर्मन भाषेत; इंडोनेशिया येथे इंडोनेशियन भाषेत; युनायटेड किंगडम्, रशिया, फ्रान्स, रोमानिया, हंगेरी, हॉलंड, बेल्जियम, इस्रायल, इस्टोनिया आणि इटली येथे इंग्रजी अन् फ्रेंच या भाषांत; तर बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि मेक्सिको येथे स्पॅनिश भाषेत, अशी एकूण ‘ऑनलाईन’ २१ व्याख्याने अन् ६ कार्यशाळा घेण्यात आल्या. १२ सहस्र ४८३ जिज्ञासूंनी या प्रवचनांचा, तर ४२ जिज्ञासूंनी कार्यशाळांचा लाभ घेतला.
याचबरोबर डिसेंबर २०२० मध्ये सद्गुरु सिरियाक वाले यांनी १४, तर पू. रेन्डी इकारांतियो यांनी ६ ‘ऑनलाईन’ ‘सामूहिक नामजप सत्रे (ग्रुप चँटिंग सेशन्स)’ घेतली. याचा एकूण ११ सहस्र ३५४ साधक आणि जिज्ञासू यांनी लाभ घेतला.
६. विविध विभागांत घेण्यात आलेल्या सत्संगांची संख्या
श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’
– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (जानेवारी २०२१)