आमच्या गुरुमाऊलीचा जन्मोत्सव सोहळा ।

परात्पर गुरु डॉ. आठवले
श्रीमती उषा बडगुजर

त्रैलोक्याचे नाथ बसले सिंहासनी ।

ब्रह्मांंडातील सारे जीव झाले हर्षभरित ॥ १ ॥

भक्तवत्सल, करुणाकर  अन् सुंदर मनमोहनाचे रूप ।

पाने आणि फुले आनंदली त्यांच्या चरणी जाण्यास ॥ २ ॥

साधकांच्या मनी दाटला भाव, भक्ती अन् आनंद ।

श्रीमन्नारायणाचे रूप साठविले नयनांत ॥ ३ ॥

सडा अन् रांगोळी यांनी सजले ब्रह्मांंड ।

देवता आणि ऋषिमुनी झाले हर्षभरित ॥ ४ ॥

फुलांची करांजली करून सज्ज झाल्या देवता ।

अन् त्यांनी श्रीमन्नायणाच्या चरणी वाहिली फुले ॥ ५ ॥

साधकांनी भरली ओंजळीत भाव, भक्ती, तळमळ,

शरणागत अन् कृतज्ञता भाव यांची फुले ।

अन् वाहिली श्रीविष्णुरूपी गुरुमाऊलींच्या चरणी ॥ ६ ॥

श्रीमन्नारायणाच्या चैतन्याने न्हाऊन निघाले ब्रह्मांंड ।

मनी अखंड धावा होता, गुरुमाऊलींनी घ्यावे चरणांशी ॥ ७ ॥

गुरुमाऊलींचे रूप सुंदर साठविलेे हृदयात ।

सोहळा अनुभवता भावाश्रू वाहिले ॥ ८ ॥

श्रीमन्नारायणांच्या चरणांशी ।

कोटीशः कृतज्ञ आहेत सारे जीव ॥ ९ ॥

– श्रीमती उषा बडगुजर, जळगाव (७.५.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक