आम्हाला पाकसमवेत रहायचे नसून भारतात विलीन व्हायचे आहे !
पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांची घोषणा
भारतानेही गांधीगिरी सोडत पुढाकार घेऊन पाकव्याप्त काश्मीर आता मुक्त करून भारताच्या नियंत्रणात आणले पाहिजे !
कोटली (पाकव्याप्त काश्मीर) – आता आम्हाला पाकसमवेत रहायचे नाही. आम्हाला भारतात विलीन व्हायचे आहे, अशी घोषणा पाकव्याप्त काश्मीरमधील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. कोटली येथे एकाच व्यासपिठावरून सर्वपक्षीय नेत्यांनी ही मागणी केल्याचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. हा व्हिडिओ गेल्या मासातील ११ फेब्रुवारीचा असल्याचे म्हटले जात आहे. या सभेत पाकवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. ज्या ठिकाणी ही सभा आयोजित करण्यात आली होती, त्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांची सभा झाली होती.
१. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे (जे.के.एल्.एफ्.चे) नेते ताकीर गिलानी यांनी सभेत मार्गदर्शन करतांना म्हटले की, ज्या प्रकारे ५ ऑगस्ट २०१९ मध्ये काश्मीरविषयीचे कलम ३७० रहित केल्यानंतर तेथील लोकांचा पाककडून अपेक्षाभंग झाला आणि त्यांनी भारतासमवेत रहाण्याचा निर्णय घेतला, तसेच आम्हीही भारतात विलीन होऊ. आम्ही कोणतीही फाळणी स्वीकारणार नाही.
२. जे.के.एल्.एफ्.च्या अन्य एका नेत्याने म्हटले की, आम्ही भारतामुळे नाही, तर पाकमुळे स्वातंत्र्यापासून वंचित आहोत. भारताने नाही, तर पाकने आमचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. भारत आमच्या स्वातंत्र्याच्या लढाइमध्ये साहाय्य करण्यास बाध्य आहे.