शासकीय रुग्णालयाच्या परिसरात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०० खाटांच्या रुग्णालयासाठी ९३ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप
सांगली, ५ मार्च (वार्ता.) – राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत सांगली जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय परिसरामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०० खाटांच्या रुग्णालयासाठी ९३ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने १०० खाटांचे महिला, नवजात शिशू रुग्णालय आणि धर्मशाळा बांधकाम यांचा समावेश आहे. हे प्रकल्प लवकरच मार्गी लागतील, अशी माहिती भाजप आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी पत्रकारांना दिली.