मराठा समाजाला आरक्षण द्या; अन्यथा परिणामांना सामोरे जा ! – चंद्रकांत पाटील
मुंबई – मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या वेळी त्यांनी ‘मराठा समाजाला आरक्षण द्या; अन्यथा परिणामांना सामोरे जा’, अशी चेतावणीही दिली आहे. ५ मार्च या दिवशी चंद्रकांत पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.