मुंबईतील कराची बेकरीची शाखा बंद !

७४ वर्षे शत्रूराष्ट्राच्या राजधानीचे नाव देऊन आणि दुकानांच्या अनेक शाखा निर्माण करून मुसलमान पैसे कमावू शकतात, असे केवळ भारतातच होऊ शकते !

मुंबई – आर्थिक कारणामुळे मुंबईतील बांद्रा येथील ‘कराची बेकरी’ची शाखा बंद करण्यात येत आहे, असे या बेकरीचे मालक हाजी शेख यांनी म्हटले आहे. देशभरात कराची बेकरीच्या शाखा आहेत. कराची हे पाकिस्तानच्या पूर्वीच्या राजधानीचे नाव असल्याने या बेकरीच्या नावाला काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला होता. त्यामुळे ही शाखा बंद होणे, हा आमच्या आंदोलनाचा परिणाम आहे, असे मनसेने म्हटले आहे. या बेकरीची मुख्य शाखा भाग्यनगर येथे आहे.

पाकिस्तानच्या कराचीशी याचा तसा काही संबंध नसून वर्ष १९५३ पासून ही बेकरी अस्तित्वात आहे, असे सांगण्यात आले. या बेकरीचे मालक स्वातंत्र्यापूर्वी कराची येथे रहात होते. फाळणीनंतर ते भारतात आले. (मग भारतातील एखाद्या शहराचे नाव का दिले नाही ? भारतात येऊनही इतकी वर्षे पाकिस्तानच्या शहराचे नाव दुकानाला का दिले ? याचा अर्थ त्यांच्या निष्ठा तिथेच आहेत, असेच कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)