पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी पैसे घेऊन मतिमंद मुलीवरील बलात्काराचे प्रकरण दडपले !
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार रामदास कदम यांचा विधान परिषदेत गंभीर आरोप
मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – खेड येथील एका १७ वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार वर्ष २०२० मध्ये खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या नातेवाइकांशी आर्थिक व्यवहार करून पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी प्रकरण दडपले, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी ५ मार्च या दिवशी सभागृहात केला. या प्रकरणी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माहिती घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना दिले.
सभागृहात विषय मांडतांना रामदास कदम म्हणाले, ‘‘पत्की यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांच्यावर स्थानांतराची कारवाई करण्यात आली असूनही त्या अद्याप खेड येथे कार्यरत आहेत. त्यांचे केवळ स्थानांतर न करता त्यांना निलंबित करावे.’’