भारतीय मालिकांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करणार्या तिघा अफगाणी महिलांची इस्लामिक स्टेटकडून हत्या
काबूल (अफगाणिस्तान) – इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी जलालाबाद येथे अकाशवाणी आणि दूरचित्रवाणी केंद्रांवर काम करणार्या ३ महिलांची हत्या केली, तर एक महिला घायाळ झाली. या तिघीही १८ ते २० वयोगटातील होत्या. कार्यालयातून घरी जात असतांना त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले.
Islamic State militants say they shot dead three women who worked for TV station in Afghanistanhttps://t.co/LqMh3xQwt5
— BBC News (World) (@BBCWorld) March 3, 2021
या तिघी तुर्कस्तान आणि भारत येथील नाटक आणि मालिका यांचे स्थानिक भाषा दारी अन् पश्तू यांमध्ये भाषांतर करत होत्या. पोलिसांनी आक्रमण करणार्या आतंकवाद्यांना पकडले असून त्यांनी ते ‘तालिबानी’ असल्याचे म्हटले आहे; मात्र तालिबाने या आक्रमणामागे त्यांचा हात असल्याचा आरोप फेटाळला आहे. त्यानंतर इस्लामिक स्टेटने त्याचे दायित्व स्वीकारले आहे.
Three women were gunned down in Jalalabad in #Afghanistan after leaving work at a local TV station. The Islamic State militant group has claimed responsibility, though Afghan officials blame the Taliban – who have denied any involvement. pic.twitter.com/6BBg2YmAy6
— DW Hotspot Asia (@dw_hotspotasia) March 4, 2021