पाकमध्ये कोरोनावरील चिनी लस घेतलेल्यांपैकी तिघांना कोरोनाची लागण
चिनी वस्तूंची गुणवत्ता जशी हलक्या दर्जाची असते, तसाच प्रकार त्याच्या लसीविषयीही आहे, हेच यातून लक्षात येते !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – चीनने पाकला दिलेली कोरोनावरील लस घेऊनही पाकमधील तिघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही आरोग्य कर्मचारी आहेत. यात एक डॉक्टर, एक मुख्य परिचारिका आणि एक वॉर्डप्रमुख आहे. लस घेतल्यानंतर १५ दिवसांनी त्यांना कोरोनाची बाधा झाली.
१. पाकिस्तान मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशरफ निजामी यांनी म्हटले की, कोणतीही लस १०० टक्के परिणामकारक ठरू शकत नाही. कोरोनापासून वाचण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
दुनिया को कोरोना महामारी में धकेलने वाले चीन की कोरोना वैक्सीन एक बार फिर सवालों में घिर गई है#China #Pakistan #Vaccine https://t.co/kiQN4l2BaJ
— Zee News (@ZeeNews) March 4, 2021
२. चीनने पाकला त्याच्या ‘सिनोफार्म’ लसीचे ५ लाख डोस दिले आहेत आणि आणखी काही लाख डोस चीन देणार आहे. चीनच्या लसीवर यापूर्वीच जगभरातून शंका उपस्थित करण्यात आली आहे. श्रीलंकेने चीनची लस घेण्याऐवजी भारताकडून लस घेण्याचा निर्णय घेतला आहे.