सनदी अधिकार्‍यांसह १० जणांविरुद्ध गुन्हा नोंद

ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६ कोटी ७३ लाख ५५ सहस्र ९४६ रुपयांचा घोटाळा

ठाणे, ४ मार्च (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६ कोटी ७३ लाख ५५ सहस्र ९४६ रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी विद्यमान सनदी अधिकारी अशोक करंजकर यांच्यासह १० जणांच्या विरुद्ध येथील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी चौकशी चालू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठाणे परिवहन सेवेच्या (टी.एम्.टी.) ४७० प्रवासी बसथांब्यांच्या जागी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा (बीओटी)’ या तत्त्वावर प्रवासी निवारे बांधून त्यावर जाहिरात प्रदर्शित करण्याचा ठेका देण्यात आला होता. यात घोटाळा झाल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.