श्रीराममंदिर ७० नाही, तर १०७ एकरमध्ये उभारण्यात येणार !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिराचे बांधकाम चालू आहे. येथे आता ७० नाही, तर १०७ एकरमध्ये हे मंदिर आणि त्याचा परिसर असणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्र्स्टने मूळ ७० एकर भूमीच्या शेजारील भूमी विकत घेतली आहे. ट्रस्ट आणखी भूमी विकत घेण्याच्या सिद्धतेत आहे. यासंदर्भात मंदिराच्या शेजारील अन्य मंदिरे, घरे आणि मैदान यांच्या मालकांशी याविषयी चर्चा करण्यात येत आहे.