अपघातग्रस्त डिझेल टँकरमधील सहस्रो लिटर डिझेल लुटले
यवतमाळ, ४ मार्च (वार्ता.) – यवतमाळ-वणी मार्गावरील शिवारात मध्यरात्री डिझेलच्या टँकरचे टायर फुटले आणि तो उलटला. याची वार्ता शेजारील गावांत पसरल्यावर क्षणार्धात टँकरमधील सहस्रो लिटर डिझेल लोकांनी लुटून नेले. या वेळी राजस्थान येथील चालक आणि वाहक घायाळ अवस्थेत तसेच पडून होते; मात्र त्यांना कुणीही साहाय्य केले नाही. (असे होणे हा तर मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचाच प्रकार ! – संपादक) शेवटी उपसरपंच संतोष गवई यांनी इतरांच्या साहाय्याने दोन्ही घायाळांना बाहेर काढून उपचारासाठी नेले. पोलिसांनी मात्र या प्रकरणी दुसर्या दिवशीही कुठलीच कारवाई केली नाही.