वर्ष २०५० पर्यंत जगातील ४ पैकी एकाला श्रवणदोष होणार ! – जागतिक आरोग्य संघटना
७३ लाख कोटी रुपयांच्या हानीची शक्यता
विज्ञानाने केलेल्या तथाकथित प्रगतीचा दुष्परिणाम !
जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – वर्ष २०५० पर्यंत जगातील प्रत्येकी ४ पैकी एक व्यक्तीला श्रवणदोषाच्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते, अशी चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. ही समस्या अधिक वाढल्यास जगाला प्रतिवर्षी अनुमाने १ लाख कोटी डॉलरचा (७३ लाख कोटी रुपयांचा) फटका बसू शकतो. संसर्ग, वाढता गोंगाट, जीवनशैली, गॅजेटचा वाढता वापर इत्यादी गोष्टींमुळे ही समस्या येऊ शकते, असे यात म्हटले आहे. या समस्येच्या निराकरणासाठी अधिकाधिक गुंतवणूक करण्याचा सल्लाही या संघटनेने दिला आहे. या समस्येपासून बचावासाठी विशेष पॅकेजचा प्रस्तावही संघटनेने दिला आहे. यात प्रतिव्यक्ती वार्षिक अनुमाने १०० रुपये खर्च येणार आहे.