‘सारथी’ बंद करण्यास उपमुख्यमंत्रीच उत्तरदायी ! – नरेंद्र पाटील
सातारा, ४ मार्च (वार्ता.) – तत्कालीन फडणवीस सरकारने ‘सारथी’, ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ’, ‘छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती’, आदी योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला; मात्र राजकीय हेतूने ‘सारथी’ बंद केले. त्यातील ३५२ मराठा बांधवांच्या नोकर्या गेल्या. याला उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तरदायी आहेत. तसेच ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा’चे संचालक मंडळ बरखास्त करण्यास मंत्री अशोक चव्हाण उत्तरदायी आहेत, असा घणाघात माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला.
पाटण (जिल्हा सातारा) येथील तहसील कार्यालयासमोर चालू असलेल्या ठिय्या आंदोलनाला मुंद्रुळकोळे ग्रामस्थांसह नरेंद्र पाटील यांनी पाठिंबा दिला. तेव्हा ते बोलत होते.