कोरोना महामारी काळात खरेदी केलेल्या साहित्यात ३५ कोटी रुपयांचा घोटाळा

कोल्हापूर – कोरोना महामारी काळात करण्यात आलेल्या ८८ कोटी रुपयांच्या साहित्याच्या खरेदीमध्ये ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. खरेदी करण्यात आलेल्या पुरवठादारांची देयके देतांना समितीच्या अध्यक्षांच्या स्वाक्षर्‍या न घेता एका कंत्राटी कर्मचार्‍यांच्या स्वाक्षरीने देयके देण्यात आली आहेत. हे पुरवठादार कोणत्या राजकीय नेत्याचे कुटुंबीय आहेत ते लवकरच घोषित करू. या घोटाळ्याचे ‘कॅग’च्या माध्यमातून अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी २ मार्च या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. (कोरोना महामारीतही भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचारात किती आकंठ बुडालेले असतील, याची कल्पना येते. अशांची पाळेमुळे खणून काढून त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. – संपादक)