प्रश्न ऐकून पोलीस आयुक्त हसत हसत पत्रकार परिषदेतून निघून गेले
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण
पुणे – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयित मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे का ?, शवविच्छेदन अहवाल नेमका काय आला आहे ?, यांसारखे प्रश्न पुण्यामध्ये २ मार्च या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारले; मात्र कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे हसतच जागेवरून उठले आणि पत्रकार परिषद सोडून निघून गेले. पत्रकार त्यांना काहीतरी माहिती द्या’, अशी विनंती करत होते; पण त्याकडे दुर्लक्ष करत गुप्ता तेथून निघून गेले.