पूजा चव्हाण हिचा मृत्यू जबर दुखापतीमुळे !
पुणे, ३ मार्च – पूजा चव्हाण हिचा शवविच्छेदन अहवाल २ मार्च या दिवशी पोलिसांना मिळाला. त्यानुसार तिचा मृत्यू जबर दुखापतीमुळे झाला आहे. पूजाचा मणका आणि डोके यांना गंभीर दुखापत झाली होती, असे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने ही माहिती दिली. वानवडी पोलिसांनी याविषयी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. लवकरच आम्ही माध्यमांना सविस्तर माहिती देऊ, असे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणात पुण्यातील वानवडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला नव्हता.