गुंटूर (आंधप्रदेश) येथे सीतामातेच्या पदचिन्हांच्या ठिकाणी ख्रिस्त्यांकडून विशाल क्रॉसची उभारणी !
भाजपचा विरोध
|
(चित्रावर क्लिक करा)
गुंटूर (आंधप्रदेश) – आंध्रप्रदेशातील मंदिरांची तोडफोड होण्याच्या अनेक घटना घडल्यानंतर आता येथील हिंदूंच्या धार्मिक स्थळाच्या समोर अवैधरित्या एक विशाल क्रॉस उभारण्याचा प्रयत्न ख्रिस्त्यांकडून केला जात आहे. येथील इदलापाडू येथे हा क्रॉस उभारण्यात येत आहे. याच ठिकाणी सीतामातेची पदचिन्हे उमटलेली आहेत, अशी मान्यता आहे. त्याला हानी पोचवण्यात आली आहे. आंध्रप्रदेशचे भाजपचे सहप्रभारी सुनील देवधर यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी याची छायाचित्रेही पोस्ट केली आहेत. या क्रॉसच्या मागे भगवान नरसिंह यांची मूर्तीही दिसत आहे.
🚩 जागो ! 🚩
आंध्र के गुटूंर में माता सीता के पदचिन्ह के स्थान पर ईसाई कर रहे है विशाल क्रॉस की स्थापना !
क्या यह धर्मनिरेपक्षता हैं ?https://t.co/k7kKca4LUY#PseudoSecularism#ThursdayThought#thursdayvibes pic.twitter.com/hMfuM1Yv1c
— Sanatan Prabhat (@sanatanprabhat) March 4, 2021
Evangelists build a huge #Christian cross-shaped structure at the holy site of #Hindus
BJP leaders have alleged that the huge Christian Cross symbol was put up illegally in #Guntur, #AndhraPradesh, India where Hindus believed Devi Sita Maa’s footprints existed.#ChristianPorter pic.twitter.com/a071uM8BQY
— हिन्दू क्रांति (@HinduKranti1) March 3, 2021
‘ऑर्गेनायजर’ने दिलेल्या वृत्तानुसार
१. हिंदू या ठिकाणी प्राचीन काळापासून विवाहाचे आयोजन करत आले आहेत; मात्र गेल्या काही वर्षांपासून ख्रिस्त्यांनी येथे हळूहळू त्यांचे बस्तान बसवले आणि आता ते येथील टेकडीवर त्यांचा दावा करत आहेत.
Andhra Pradesh: Conversion Mafia builds huge cross in Edlapadu, destroys Sita Paduka; YSR Congress sponsored Christianisation drive on full swing: https://t.co/A6ulP4VY42 via @eOrganiser
— Organiser Weekly (@eOrganiser) March 2, 2021
२. राज्यात जगनमोहन रेड्डी यांचे सरकार आल्यानंतर येथे चर्चही उभारण्यात आले आहे. भाजप आणि संघ यांनी विरोध केल्यानंतरही प्रशासनातील अधिकारी ख्रिस्ती असल्याने ते चर्चला साहाय्य करत आहेत.
Andhra Pradesh: Evangelists build a huge Christian cross-shaped structure at the holy site of Hindus, alleges BJP https://t.co/zgwYOEOcrY
— OpIndia.com (@OpIndia_com) March 2, 2021
३. पोलिसांनी एका व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण देतांना म्हटले आहे, ‘हिंदूंच्या पवित्र ठिकाणी ख्रिस्त्यांनी ‘क्रॉस’सारखे कुठलेही बांधकाम केलेले नाही. हिंदूंचे पवित्र स्थळ टेकडीच्या दुसर्या टोकाला आहे, तर क्रॉस त्यांच्या विरुद्ध दिशेला आणि दूर आहे’; मात्र पोलिसांनी यात क्रॉस उभारणीला अनुमती मिळाली आहे कि नाही, याची कोणतीही माहिती दिलेली नाही.