एकादशी आणि चतुर्थी या तिथींना मांसविक्री न करण्याचे ठरल्यावर दुकानदारांकडून दुकाने बंद ठेवत सहकार्य !
हिंदूंच्या पवित्र तिथींना मांसविक्री बंद करण्याचा ठराव करणारे गोंदेगाव ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य यांचे अभिनंदन ! गोंदेगावचा आदर्श अन्य गावांनीही घ्यायला हवा !
संभाजीनगर, ३ मार्च (वार्ता.) – गोंदेगाव ग्रामपंचायतीने नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ‘एकादशी आणि चतुर्थी या तिथींना बाजारात कोणत्याही प्रकारची मांसविक्री करू नये’, असा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार २ मार्च या दिवशी अंगारक चतुर्थीनिमित्त गोंदेगाव येथील बाजारात मांसविक्री करणारे एकही दुकान उघडले नव्हते. दुकानदारांनीही दुकाने बंद ठेवत सहकार्य केले. ग्रामसभा ठरावाची प्रभावी कार्यवाही करण्यात आल्याने सर्व गावकर्यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले.