फ्रान्समध्ये पाद्रयांनी १० सहस्र मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा अंदाज
|
|
पॅरिस (फ्रान्स) – वर्ष १९५० पासून फ्रान्समधील चर्चच्या पाद्रयांच्या लैंगिक शोषणाला १० सहस्र मुले बळी पडली असावीत, अशी माहिती अल्पवयीन मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराची चौकशी करण्यासाठी कॅथोलिक चर्चने स्थापन केलेल्या चौकशी समितीचे प्रमुख जीन-मार्क सॉवे यांनी दिली.
The head of an independent commission has said that there could be at least 10,000 victims of sexual abuse in the Catholic Church in France since 1950. https://t.co/U7VvGEfo5u
— Catholic News Agency (@cnalive) March 3, 2021
१. सॉवे म्हणाले की, जून २०१९ मध्ये पीडित आणि या अत्याचारांचे साक्षीदार यांना त्यांच्या तक्रारी नोंद करण्यासाठी ‘हॉटलाईन’ स्थापन करण्यात आली होती. त्याद्वारे पहिल्या १७ मासांतच ६ सहस्र ५०० दूरध्वनी आले. आमच्यासाठी मोठा प्रश्न हाच आहे की, अत्याचार झालेल्यांपैकी नेमके किती पीडित पुढे आले आहेत ? ते २५ टक्के आहेत कि १० कि ५ टक्के किंवा त्यापेक्षा अल्प ?
The head of an independent enquiry investigating church child abuse in France said that there might have been up to 10,000 victims since 1950.https://t.co/4yUAqkzS8o
— News18.com (@news18dotcom) March 2, 2021
२. मोठ्या प्रमाणात आणि वारंवार होणार्या बाल अत्याचारांच्या घटनांच्या चौकशीसाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये फ्रान्सच्या बिशप्स कॉन्फरन्सने चौकशी समितीची स्थापना करण्यास सहमती दर्शवली होती. या समितीतीत कायदेशीर, शैक्षणिक आणि वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या २० हून अधिक तज्ञांचा समावेश असलेल्या या चौकशी समितीचा अहवाल २०२० च्या शेवटी देण्यात येणार होता; परंतु यावर्षी सप्टेंबरपर्यंत समितीची मुदत वाढवण्यात आली आहे.