भव्य स्वरूपात निघाली निरंजनी आखाड्याची पेशवाई !
हरिद्वार येथील कुंभमेळा
- मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
- हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी !
हरिद्वार (उत्तराखंड) – येथे ३ मार्च या दिवशी पंचायती आखाडा श्री निरंजनीची भव्य पेशवाई काढण्यात आली. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत उपस्थित होते. त्यांनी सर्व संतांची भेट घेतली. या वेळी एक हेलिकॉप्टर आणि २ ग्लायडर (इंजिन नसलेले वार्याच्या झोतावर उडणारे आकाशयान) यांद्वारे संत आणि महंत यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या पेशवाईमध्ये उंट, हत्ती, चांदीचे सिंहासन, रथ आदी मुख्य आकर्षण होते. यामध्ये कोरोनापासून बचाव होण्याचा संदेशही देण्यात आला. पेशवाईचे नेतृत्व आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांनी केले.