गणेशोत्सवामध्ये गणेशभक्तांना शाडू मातीच्या मूर्ती उपलब्ध करून द्याव्यात ! – हिंदु जनजागृती समितीची निवेदनाच्या माध्यमातून मागणी

निवेदन स्वीकारतांना डावीकडून श्री. विकास ढाकणे (अतिरिक्त आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका) निवेदन देतांना श्री विवेकानंद विचार मंच, मोई येथील श्री. काळूराम फलके, श्री. गोरख फलके आणि समितीचे श्री. रघुनाथ ढोबळे
निवेदन देतांना डावीकडून पुणे येथील शिवसमर्थ कोकण ट्रस्टचे श्री. गणेश पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील, पुणे येथील श्रीगौड ब्राह्मण समाजाचे श्री. मनोहरलाल उणेचा, निवेदन स्वीकारतांना पुणे महानगरपालिका आयुक्तांचे स्वीय साहाय्यक श्री. गजानन कडक

पुणे, ३ मार्च ( वार्ता.) –  पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम हौद बांधून त्यामध्ये मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले जाते, तसेच काही संघटना मूर्तींचे विसर्जन न करता दान करण्याची अशास्त्रीय मोहीम राबवतात. हे सगळे अशास्त्रीय प्रकार थांबवण्यासाठी आणि प्रथा-परंपरेने गणेशमूर्तींचे शास्त्राप्रमाणे विसर्जन करता येण्यासाठी गणेशोत्सवामध्ये नागरिकांना शाडू मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. २६ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथे पुणे महानगरपालिका आयुक्तांचे स्वीय साहाय्यक श्री. गजानन कडक यांनी निवेदन स्वीकारले. मा. आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी निमंत्रित करू, असे सकारात्मक आश्‍वासन दिले. तर १ मार्च या दिवशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. विकास ढाकणे यांनी निवेदन स्वीकारले.