‘अॅमेझॉन प्राईम’कडून विनाअट क्षमायाचना !
‘तांडव’ वेब सिरीजमधून हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्याचे प्रकरण
|
नवी देहली – ‘तांडव’ या वेब सिरीजमधून हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी ही वेब सिरीज प्रसारित करणार्या ‘अॅमेझॉन प्राईम’ या ओटीटी मंचाने विनाअट क्षमायाचना केली आहे. तसेच यापूर्वीच अवमानाचे प्रसंग हटवण्यात आल्याची माहिती दिली. या वेब सिरीजच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याच्यावर खटलाही चालू झाला आहे.
Amazon Prime Video has issued an ‘unconditional’ apology after its drama series Tandav was accused of offending Hindu religious sentiments https://t.co/kGZVYNpkjH pic.twitter.com/eHhV5aU7De
— Gadgets 360 (@Gadgets360) March 3, 2021
अॅमेझॉन प्राईमने क्षमायाचना करतांना म्हटले की, आमची काल्पनिक वेब सिरीज ‘तांडव’मधील काही दृष्ये लोकांना आक्षेपार्ह वाटली. आम्ही कुणाच्याही भावना दुखवू इच्छित नव्हतो. याविषयी आम्हाला जाणीव करून देण्यात आल्यावर आम्ही ती दृष्ये वगळली आहेत किंवा संकलित केली आहेत. आम्ही आमच्या प्रेक्षकांच्या श्रद्धांचा सन्मान करतो आणि ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची विनाअट क्षमायाचना करतो.