मुंबई येथील सेवाकेंद्रात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर साधकांना आलेल्या अनुभूती
भाग २.
मुंबई येथील सेवाकेंद्रात गुरुपादुकांची स्थापना करण्यात आली आहे. त्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूतींपैकी ३ मार्च या दिवशी पू. (सौ.) संगीता जाधव आणि अन्य साधकांना आलेल्या अनुभूती पाहिल्या आज उर्वरित अनुभूती पाहूया.
भाग १.वाचण्यासाठी पुढील लिंकवर किल्क करा : https://sanatanprabhat.org/marathi/455767.html
२. सेवाकेंद्रातील साधक
२ अ ३. सेवा करतांना चक्कर आल्यासारखे वाटणे, ‘गुरुदेवांच्या चरणपादुका डोक्यावर आहेत’, असा भाव ठेवणे आणि त्यानंतर चक्कर थांबून सेवा चांगली होणे : ‘मी स्वयंपाकघरात महाप्रसाद बनवण्याची सेवा करत होते. त्या वेळी माझ्या डोळ्यांपुढे काळोख येऊन मला चक्कर आल्यासारखे वाटले; म्हणून मी गुरुस्मरण केले. तेव्हा ‘गुरुदेवांच्या चरणपादुका माझ्या डोक्यावर आहेत आणि त्यांतून मला शक्ती अन् चैतन्य मिळत आहे’, असा भाव ठेवला आणि प्रार्थना करून महाप्रसाद बनवण्याच्या सेवेला आरंभ केला. तेव्हा ‘चक्कर कधी थांबली ?’, हे मला कळलेच नाही आणि सेवा चांगल्या प्रकारे झाली.
२ अ ४. सूक्ष्मातून गुरुपादुका पाठीवर ठेवल्यावर पाठदुखी थांबणे : एक दिवस मी स्वयंपाकघरात भाजी चिरत होते. त्या वेळी माझ्या पाठीत गोळा आला आणि पाठीतून कळा येऊन पाठ पुष्कळ दुखायला लागली. तेव्हा मी सूक्ष्मातून पाठीवर गुरुपादुका ठेवल्या आणि ‘माझ्यावर चैतन्याचा वर्षाव होत आहे’, असा भाव ठेवला. त्यानंतर माझ्या पाठीतील गोळा निघून गेला आणि माझी पाठ दुखायची थांबली.’
– सौ. उर्मिला खानविलकर, मुंबई.
२ आ. गुरुपादुकांसमोर बसून नामजप केल्यावर आलेल्या अनुभूती
२ आ १. गुरुपादुकांसमोर बसून नामजप केल्यावर तो एकाग्रतेने होणे, हृदयात गुरुपादुकांचे दर्शन होणे आणि ‘अंतर्मन नामजप करत आहे’, असे वाटणे : ‘एकदा मी सेवाकेंद्रात आसंदीवर बसून नामजप करत होते. तेव्हा मला ग्लानी येत होती; म्हणून मी गुरुपादुकांसमोर बसून नामजप करू लागले. त्या वेळी नामजप एकाग्रतेने होऊ लागला. ‘तो नामजप हृदयातून गुरुपादुकांपर्यंत पोचत आहे’, असे अनुभवत असतांना मला पुष्कळ शांत वाटत होते. मला माझ्या हृदयात गुरुपादुकांचे दर्शन होत होते. ‘माझे अंतर्मन नामजप करत आहे’, असे मला वाटत होते. ‘त्या वेळी एक नामजप, म्हणजे एक फूल गुरुचरणांवर अर्पण करत आहे’, असा भाव ठेवून माझा पूर्ण एक घंटा नामजप झाला. त्यासाठी मी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – सौ. अनिता वागराळकर, मुंबई
२ आ २. ‘मी गुरुपादुकांसमोर बसून नामजप करत होते. तेव्हा मला गुरुपादुकांच्या समोर ‘ॐ’ दिसत होता.’ – सौ. ऊर्मिला खानविलकर, मुंबई
२ आ ३. गुरुपादुकांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व अनुभवता येणे : ‘गुरुपादुका पाहिल्यावर माझे मन भरून आले आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. त्या वेळी ‘चैतन्याचे किरण माझ्या दिशेने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला वाटत होते. ‘गुरुपादुकांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले पांढरा सदरा घालून सूक्ष्मातून उभे आहेत’, असे दिसत होते. काही वेळा मला गुरुदेवांचे जन्मोत्सवाच्या वेळचे तुळशीचा हार घालून बसलेले रूप दिसत होते आणि त्यांचा हसरा तोंडवळा दिसत होता. ‘गुरुपादुका छातीशी धरून नामजप करत आहे’, असा भाव ठेवल्यावर गुरुपादुकांचा स्पर्श मला जाणवत होता.’ – सौ. प्रवीणा पाटील, भांडुप, मुंबई
२ आ ४. ‘श्री गुरुपादुकांकडे पाहून नामजप केल्यावर माझा नामजप एका लयीत आणि श्वासाला जोडून होत होता.’ – श्री. सतीश बांगर, मुंबई
२ इ. गुरुपादुकांच्या संदर्भात वायु आणि आप तत्त्वाची अनुभूती येणे
२ इ १. ध्यानमंदिरात बसलेले एक साधक हलतांना दिसणे, श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी ‘पादुका आणि ध्यानमंदिर अधांतरी उचलले गेले असून ज्याप्रमाणे झोपाळा हलतो, त्याप्रमाणे ते हलत आहे, म्हणजे वायुतत्त्व कार्यरत आहे’, असेे सांगणे अन् ते साधक ध्यानाच्या वेळी त्या झोतात आल्यामुळे हलतांना दिसत असल्याचे लक्षात येणे : ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सेवाकेंद्रात येणार होत्या. त्या वेळी मी रात्रीच्या नामजपासाठी ध्यानमंदिरात बसले होते. तेव्हा ध्यानमंदिरात बसलेले एक साधक मला हलतांना दिसले. तेव्हा मला वाटले, ‘मला चक्कर येत आहे का ?’; म्हणून मी डोळे चोळले आणि पुन्हा नामजप चालू केला, तरी ‘ते साधक हलत आहेत’, असे मला दिसले. मला त्यांच्याकडे पाहून हलकेपणा जाणवत होता. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी सांगितले, ‘‘पादुका आणि ध्यानमंदिर अधांतरी उचलले गेले आहे. ज्याप्रमाणे झोपाळा हलतो, त्याप्रमाणे ते हलत आहेत, म्हणजे वायुतत्त्व कार्यरत आहे.’’ ते साधक ध्यानाच्या वेळी त्या झोतात आल्यामुळे हलतांना दिसत होते. हे ऐकतांना मला आनंद होत होता. ‘गुरुदेवांनी मला हे अनुभवण्याची संधी दिली’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’ – कु. दीपाली कदम, ठाणे
२ इ २. गुरुपादुका हवेत तरंगत असल्याचे जाणवणे : ‘एकदा मी ध्यानमंदिरात नामजप करत होते. ‘तेव्हा गुरुपादुकांमधून पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे’, असे दिसत होते. त्या वेळी गुरुपादुकांच्या भोवती लख्ख प्रकाश दिसत होता आणि ‘गुरुपादुका हवेत तरंगत आहेत’, असे वाटत होते. त्या वेळी माझ्या अंतर्मनात कृतज्ञताभाव जागृत झाला आणि पूर्ण शरिरात थंडावा जाणवत होता. काही दिवसांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सेवाकेंद्रात आल्यावर त्यांनीही गुरुपादुका हवेत तरंगत असल्याचे सांगितले.’ – सौ. चारुलता नखाते, मुंबई
२ इ ३. गुरुपादुकांच्या समोरील लादीवर पाण्याच्या लाटा वहात असल्याचे जाणवणे : ‘मला आरंभी गुरुपादुकांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले उभे आहेत’, असे जाणवायचे आणि नंतर त्या ठिकाणी ‘पांढर्या रंगाचा द्रव असलेली मोठी नलिका खोलवर गेलेली आहे’, असे जाणवायचे आणि नंतर काही दिवसांपासून ध्यानमंदिरातील गुरुपादुकांच्या समोरील लादीकडे पाहिल्यावर ‘तेथे पाण्याच्या लाटा वहात आहेत’, असे जाणवायचे.’ – श्री. रमेश मुंज, बोरीवली, मुंबई.
२ ई. इतर अनुभूती
२ ई १. गुरुपादुकांचे छायाचित्र असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ पोटावर ठेवल्यावर पोटदुखी थांबणे : ‘एकदा माझ्या पोटात पुष्कळ दुखत होते; म्हणून मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेले गुरुपादुकांचे छायाचित्र पोटावर ठेवले. त्या वेळी मला होणार्या वेदना थांबल्या.’ – सौ. प्रवीणा पाटील, भांडुप, मुंबई.
(समाप्त)
|