रायगडावरील ३२ मण सोन्याचे सिंहासन लवकर होण्यासाठी पू. भिडेगुरुजी यांचे शनीदेवाला साकडे !
नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उजाळा म्हणून रायगडावरील ३२ मण सोन्याचे सिंहासन लवकर व्हावे, असे साकडे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाला साकडे घातले. पू. भिडेगुरुजी यांनी शनिशिंगणापूर येथे भेट देत शनीच्या मूर्तीचे दर्शन घेतले. या वेळी शनिशिंगणापूर देवस्थान समितीचे विश्वस्त अध्यक्ष भागवत बानकर यांनी त्यांचे स्वागत केले. देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर, विश्वस्त बाळासाहेब बोरूडे या वेळी उपस्थित होते. नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष केला.
छत्रपतींचे सुवर्ण सिंहासन…
https://www.esakal.com/ahmednagar/bhide-guruji-shinganapur-chhatrapatis-golden-throne-414943Posted by Sakal on Monday, March 1, 2021
पू. भिडेगुरुजी म्हणाले की, महाराष्ट्रातील ३८ जिल्हे आणि ३९४ तालुके यांत छत्रपतींचे कार्य अन् शिवप्रतिष्ठान यांचा संकल्प पोचवायचा आहे. नेवासा तालुका ही संतांची भूमी असून येथून प्रतिष्ठानला पुष्कळ अपेक्षा आहेत.