७ रेल्वे स्थानकांवरील फलाट तिकिटाच्या दरात पाचपट वाढ
-
१० रुपयांऐवजी ५० रुपये द्यावे लागणार
-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड या रेल्वे स्थानकांचा समावेश
मुंबई – येथील काही रेल्वे स्थानकांवरील फलाट तिकिटाच्या दरात रेल्वेने पाचपट वाढ केली आहे. २४ फेब्रुवारी या दिवशी हा निर्णय घेण्यात आला असून १५ जूनपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, भिवंडी रोड या स्थानकांवर तिकिटासाठी ५० रुपये द्यावे लागणार आहेत.
उन्हाळ्यात कोरोनाचा धोका असल्याने रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. पूर्वी या सर्वच स्थानकांवर तिकिटाचा दर १० रुपये इतका होता.