कोडोली (तालुका पन्हाळा) परिसरात चोरून होणारी गोहत्या थांबवा !
विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे पोलीस ठाण्यात निवेदन
कोडोली (जिल्हा कोल्हापूर), २ मार्च (वार्ता.) – कोडोली येथे एका संशयित व्यक्तीने रहात्या घरी बैलाची हत्या केली. राज्यात गोहत्या बंदी कायदा संमत असतांना, तसेच कोडोली ग्रामपंचायतीत पशूवधगृह बंदीचा ठराव असतांना याचे उल्लंघन अनेकजण वारंवार करतात. तरी असे कृत्य करणार्यांचा शोध घेऊन लवकरात लवकर कडक कारवाई करावी; अन्यथा बजरंग दलाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या वतीने साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांना देण्यात आले.
या वेळी कोल्हापूर जिल्हा संयोजक श्री. सुरेश रोकडे, गोरक्षाप्रमुख श्री. पवन उगळे, तालुका संयोजक श्री. विशाल परिट, शहर सह-संयोजक श्री. प्रथमेश पाटील, विश्व हिंदु परिषद सहमंत्री श्री. विजय पाटील, श्री. सचिन मांगलेकर उपस्थित होते.