वणी-कायर रेल्वे मार्गावर कोळसा भरलेले १२ डबे रूळावरून घसरले
वणी (यवतमाळ), २ मार्च (वार्ता.) – येथील कोळसा खाणीतील कोळसा १ मार्च २०२१ या दिवशी रेल्वेने नांदेडकडे नेण्यात येत होता. बाबापूर फाट्याजवळ कोळसा भरलेले १२ डबे रूळावरून घसरले. या अपघातात जीवितहानी झाली नाही; मात्र रेल्वे रूळ विस्कटल्याने रेल्वेमार्ग बंद करावा लागला. अपघाताचे नेमके कारण समजले नाही.