ओडिशा येथील धर्मप्रेमींनी हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभे’च्या प्रसारामध्ये घेतलेला उत्स्फूर्त सहभाग
२१ फेब्रुवारी या दिवशी हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ पार पडली. या सभेच्या प्रसारासाठी ओडिशा येथील धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या धर्मप्रेमींनी धर्मसभेचे निमंत्रण देणे, तसेच व्हॉट्सअॅप आणि फेसबूक या सामाजिक माध्यमांद्वारेही प्रसार केला. या वेळी धर्मप्रेमींनी आनंद अनुभवण्यासह त्यांना सेवा करण्याचे महत्त्वही लक्षात आले. या सभेच्या प्रसारासाठी भुवनेश्वर येथील काही मंदिरांमध्ये सभेच्या निमंत्रणांचे भित्तीपत्रकही लावण्यात आले.
श्री. जसकेतन जेना
सभेच्या पूर्वी २-३ दिवस संपर्काची सेवा करतांना पुष्कळ आनंद जाणवला. ही सेवा मी आणखी काही दिवस पूर्वीपासून का केली नाही ? असे वाटले. माझ्या हातून मोठी संधी गेली, असे मला वाटते. यापुढे सेवेची कोणतीही संधी सोडणार नाही.
श्री. अनन्यजा देवीदिप्ता
मी संपर्क करण्यापूर्वी नामजपादी उपाय केले नव्हते. त्यामुळे संपर्क करतांना काही अडचणी आल्या; पण संपर्क तितकेसे चांगले झाले नाहीत. नंतर मी नामजपादी उपाय करून संपर्क केले. त्यात सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अशा सेवा करतांना साधना चांगली व्हायला हवी, हे लक्षात आले. हे सर्व करतांना चांगल्या जिज्ञासूंचा संपर्क होत असल्याने उत्साह वाढत होता.
श्री. पपून पाणिग्रही
मी संपर्क सेवेसाठी अधिक वेळ द्यायला हवा होता, असे आता वाटत आहे. संपर्क करतांना मला एक गोष्ट जाणवली की, विषय आल्यास आपण आपल्याला आलेल्या अनुभूती आणि अनुभव सांगितले, तर जिज्ञासू लवकर प्रभावित होतात.
श्री. दिप्तांशु त्रिपाठी
मी माझ्या युवा मित्रांना संपर्क करत असतांना जाणवले की, त्यांच्या मनामध्ये हिंदुविरोधी शक्तींविषयी चीड आहे. काही मित्रांनी ऑनलाईन सभा पाहिल्यावर त्यांनी ‘अशी जागृती व्हायला हवी’, असे सांगितले.
अन्य विशेष
१. राऊरकेला येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. गोपीचंद गुप्ता यांनी या सभेच्या प्रचारासंबंधी परिचित कार्यकर्त्यांच्या एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीस अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते.
२. हिंदुत्वनिष्ठ श्री. शुभेंदु प्रसाद नायक यांनी स्वत: धर्मप्रेमींना निमंत्रित करून ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले. या बैठकीतही अनेक धर्मप्रेमी सहभागी झाले.
३. ‘ओडिशा क्रांति’चे संपादक श्री. अभिषेक जोशी आणि कटक येथील न्यूज पोर्टल यांनी सभेच्या बातमीला चांगली प्रसिद्धी दिली.