गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईविषयी आवाज उठवीन ! – सुभाष देशमुख, आमदार, भाजप
सोलापूर, १ मार्च (वार्ता.) – महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवर राजकीय सूडबुद्धीने खोटे गुन्हे नोंद केले जात आहेत. गोमातेचे रक्षण करणारे सुधीर बहिरवाडे आणि गोरक्षक यांच्या पाठीशी उभे राहून आवाज उठवीन, असे आश्वासन भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी दिले. अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेतली असता त्यांनी हे आश्वासन दिले.
या मागणीसाठी एकबोटे यांनी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, तसेच भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची भेट घेतली. या वेळी मिलिंद एकबोटे यांनी गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने करण्यात आलेल्या तडीपारीच्या विरोधात आपण आवाज उठवावा, तसेच सोलापुरातील गोरक्षकांच्या पाठीशी उभे रहावे, अशी विनंती केली.