सांगली येथे काळ्या खणीतून १५ दिवसांत महापालिका कर्मचार्यांनी १३ टन कचरा काढला !
सांगली – सांगलीच्या मध्यवर्ती असणारी काळी खण गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली होती. यामुळे पाणी खराब होण्यासमवेत पाण्यामध्ये दुर्गंधीही पसरली होती. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी ही खण प्रदूषणमुक्त करण्याचा निश्चय केला. त्यांच्या नियोजनामुळे महापालिका कर्मचार्यांनी १३ फेब्रुवारीपासून ही स्वच्छता मोहीम चालू केली. ५ दिवसांत १३ टन कचरा काढला आहे. यामुळे काळी खण ८० टक्के स्वच्छ झाली आहे.
या संदर्भात आयुक्त म्हणाले, ‘‘काळी खण स्वच्छ करण्यासाठी आमची यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहे; मात्र यापुढे कुणी कचरा टाकल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.’’