‘ऑडिओ क्लिप्स’ खर्या कि खोट्या हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे !
|
मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात यवतमाळ येथील रुग्णालयात जे घडले, त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, तसेच या प्रकरणात समोर आलेल्या ‘ऑडिओ क्लिप्स’ खर्या आहेत कि खोट्या हेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपचे खासदार मोहन डेलकर यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. मुख्यमंत्र्यांनी डेलकर प्रकरणाचे अन्वेषण अवश्य करावे. या प्रकरणात एकाही भाजप नेत्याचा हात नाही. किंबहुना यामध्ये भाजप नेत्याचा हात नसल्यानेच ते कुणाचेही नाव सांगत नाहीत.