तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना बजावली वानवडी पोलिसांनी नोटीस !
पुणे – माजी मंत्री संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्या विरोधात पूजाचा गर्भपात करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीसाठी तृप्ती देसाई आणि पूजाची चुलत आजी म्हणून घेणार्या शांताबाई चव्हाण यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते. जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी अशा प्रकारे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघींनाही नोटीस बजावली आहे.