पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी दिल्याचा शांताबाई चव्हाण यांचा आरोप !
पुणे – पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये पोचवले आहेत. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्येविषयी बोलायचे नाही, असा आरोप पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई चव्हाण यांनी केला. त्यामुळेच पूजा चव्हाणच्या घटनेत तिचे आई-वडील अद्यापही काही बोलत नाहीत. संजय राठोड यांच्याकडून ५ कोटी रुपये देण्यात आल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. योग्यवेळी ते पुरावे समोर आणणार आहे. मी या प्रकरणी भूमिका मांडत असल्याने माझ्या जिवालाही धोका आहे, असेही शांताबाई चव्हाण म्हणाल्या.