संजय राठोड यांच्याप्रमाणेच आता धनंजय मुंडे यांनी स्वतःविषयीची भूमिका मांडावी !
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांची पत्रकार परिषदेद्वारे मागणी
मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी. तिच्या आत्महत्येवरून जे राजकारण केले जात आहे, तसे व्हायला नको. सरकार टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले जाऊ नये. शिवसेनेचे संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे, तर आता त्यांची चौकशी व्हायला हवी. त्यांच्याप्रमाणे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी त्यांच्याशी घडलेल्या प्रकरणाविषयी स्वतः भूमिका मांडावी. त्यांनी राजीनामा द्यावा, ही भाजपची मागणी आहे. मी कुणाचेही समर्थन करणार नाही, असे प्रतिपादन भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांनी १ मार्च या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.