अंगारकी चतुर्थीला पुणे येथील मोरया गोसावी गणपति मंदिर दर्शनास बंद रहाणार !
पुणे – कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा आणि अंगारकी चतुर्थीला होणारी संभाव्य गर्दी यांमुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाय म्हणून तीर्थक्षेत्र चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिर भाविकांना दर्शनासाठी २ मार्च या दिवशी बंद रहाणार आहे. मंदिर बंद ठेवण्याचा आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय प्रशासनाने काढला आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आली.
वर्षातून केवळ २ अथवा ३ अंगारकी चतुर्थी येत असल्याने १ लाख भाविक श्रीमान महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर दर्शनासाठी तीर्थक्षेत्र चिंचवडगाव येथे येतात. राज्याच्या कानाकोपर्यातून गणेशभक्त येत असल्याने येथे यात्रेचे स्वरूप आलेले असते.