कंगना राणावत यांना जामीनपात्र वॉरंट
मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत यांना ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची अपकीर्ती केल्याचा आरोप असल्याच्या प्रकरणात अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून जामीनपत्र वॉरंट देण्यात आले आहे. १ मार्च या दिवशी असणार्या याविषयीच्या सुनावणीला त्या उपस्थित न राहिल्याने हे वॉरंट काढण्यात आले.
६ मार्चला पुढील सुनावणीसाठी उपस्थित रहाण्याचे आदेश त्यांना बजावण्यात आले आहेत.