शफेपूर (संभाजीनगर) येथील शेतकर्याची आत्महत्या !
शेतकर्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शासकीय उपाययोजनांसाह त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे. मनोबल केवळ साधना केल्यानेच वाढणार आहे. यासाठी धर्मशिक्षण घेणे अपरिहार्य आहे हे दर्शवणारी ही घटना !
संभाजीनगर – मागील काही वर्षांपासून सतत दुष्काळ आणि यंदा अतीवृष्टी या कारणाने शेतमालाची झालेली प्रचंड हानी सहन न झाल्याने तसेच कर्जाच्या विवंचनेतून पिशोर येथील शफेपूरमधील शांताराम मनोज वाघ (वय ३५ वर्षे) या शेतकर्याने गळफास लावून आत्महत्या केली.