पथकरमुक्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसही आग्रही ! – शशिकांत शिंदे
सातारा, १ मार्च (वार्ता.) – पुणे येथील खेड-शिवापूर पथकरनाका पथकरमुक्त झाला आहे. याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि तासवडे पथकरनाके पथकरमुक्त झाले पाहिजेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही आग्रही असल्याची भूमिका आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी निर्णय घेतल्यास पथकरमुक्ती होऊ शकते. याविषयी सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिल्यास त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होईल. पथकरमुक्ती आंदोलनाविषयी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्वांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करेल.