पुण्यात लसीकरणासाठी मोठी गर्दी; कमला नेहरू रुग्णालयात गर्दीमुळे गोंधळ !
लसीकरणाचे नियोजन भोंगळपणे करणे, हे प्रशासनाला लज्जास्पद! ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी त्रास सोसावा लागणे, हे शासनाला लज्जास्पद आहे !
पुणे – देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून चालू झाला आहे. या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील आणि आजारी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना कोरोनाची लस विनामूल्य दिली जाणार आहे. यामुळे पुणे येथील अनेक रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या समवेतचे लोक यांची मोठी गर्दी झाली होती. कमला नेहरू रुग्णालयात लोक सकाळपासून आलेले होते; परंतु ‘अॅप सर्व्हर’च्या समस्या आणि अन्य अडचणी यांमुळे लोकांना लस वेळेत मिळत नव्हती. त्यांना थांबून रहावे लागत होते. यामुळे येथे अधिक गर्दी होऊन गोंधळ निर्माण झाला. नियोजनाच्या अभावामुळे ज्येष्ठ नागरिकांना याचा नाहक त्रास सोसावा झाला.