राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडून सातारा येथील ‘बोरगाव कृषी विज्ञान केंद्रा’ची पहाणी
सातारा, १ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्राचे ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च आणि तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्ह्यातील ‘बोरगाव कृषी विज्ञान केंद्रा’ला भेट देऊन पहाणी केली. तसेच विविध उपक्रमांची माहिती घेऊन शेतकर्यांशी संवाद साधला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी ‘बोरगाव कृषी विज्ञान केंद्रा’च्या माध्यमातून शेतीपूरक उद्योग आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा, असा मानस व्यक्त केला. या वेळी राज्यमंत्री तनपुरे यांनी पेरू सघन लागवड, निशिगंध, हळद, रोपवाटिका, अझोला आदींची प्रत्यक्ष पहाणी केली. रोपवाटिकेतील रोपांची निगा राखण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या ‘पॉलिटनेल’चे उद्घाटन तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.