अमेरिकेत कोरोनाकाळात चिनी वंशाच्या लोकांवरील आक्रमणांत वाढ !
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून आक्रमणे रोखण्यासाठी आदेश
|
न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेत कोरोनाच्या काळापासून चिनी वंशाच्या लोकांवरील आक्रमणांमध्ये वाढ झाली आहे. व्हाईट हाऊसने चिनी लोकांवर होणार्या या आक्रमणांची नोंद घेऊन एक कार्यकारी आदेश जारी केला आहे.
Attacks against Asian-Americans in New York City have soared since the pandemic began, terrifying many and stoking fears of targeted violence. The xenophobia is also compounded by the economic fallout of the pandemic and fears of the coronavirus.https://t.co/X0p9Rg5mZt pic.twitter.com/dy1Aej1JAc
— The New York Times (@nytimes) February 26, 2021
व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव जेन साकी यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, अशी आक्रमणे कोणत्याही स्थितीत स्वीकारता येणार नाहीत. आरोग्य विभागाला सांगण्यात आले आहे की, महामारीवर बोलतांना त्यांनी ‘विशेष’ लोकांविषयी बोलू नये.
The rally was held to protest a wave of attacks on Asian Americans, including a large number of elderly people. The stabbing of a 36-year-old man on Thursday is the latest reported incident in NYC. Similar incidents are being reported across the US https://t.co/YDqrapTAVW
— CNN International (@cnni) March 1, 2021
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना पसरवण्यास चीनला उत्तरदायी धरले होते. तज्ञांनुसार ही आक्रमणे वाढण्यामागचे ट्रम्प यांचे हे वक्तव्य कारणीभूत आहे. यामुळे अमेरिकेच्या नागरिकांत चिनी लोकांविषयी द्वेष निर्माण झाला आणि त्यांना लक्ष्य केले जाऊ लागले. न्यूयॉर्कमध्येच अशा गुन्ह्यांची संख्या २९ झाली. मार्च ते डिसेंबर २०२० पर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे वांशिक गुन्ह्याचे ३ सहस्रांपेक्षा अधिक प्रकरणे नोंदवली गेली. या आक्रमणांच्या विरोधात एक मोर्चाही काढण्यात आला.