४ सहस्र रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी कसाल मंडळ अधिकारी संदीप हांगे निलंबित
केवळ नोंदी करण्यासाठीही लाच घेणारे अधिकारी असणे प्रशासनाला लज्जास्पद !
सिंधुदुर्ग – लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील कसाल मंडल अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी निलंबित केले आहे. कायदेशीर खरेदी केलेल्या भूमीच्या खरेदी खताची सातबारावर नोंद करण्यासाठी संदीप हांगे यांनी संबंधिताकडे ४ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे संबंधित व्यक्तीने हांगे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मध्यंतरी हांगे यांना लाच स्वीकारतांना पकडले होते.