मी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सदैव हिंदु जनजागृती समितीच्या समवेत आहे ! – प्रसिद्ध ज्योतिषाचार्य अनिल वत्स
हिंदु जनजागृती समिती आणि ज्योतिषाचार्य अशोक कुमार मिश्र यांच्या वतीने उत्तर भारतामध्ये ‘ऑनलाईन’ ज्योतिष संघटन बैठकीचे संयुक्त आयोजन
वाराणसी – श्रीकृष्णाच्या हातामध्ये केवळ बासरीच नाही, तर सुदर्शनचक्रही आहे. आपल्याला श्रीकृष्णनितीचे भान ठेवले पाहिजे. हा देश विश्वगुरु होता आणि पुढेही राहील; परंतु त्यासाठी मी कधीही असत्य, अन्याय, अत्याचार आणि व्यभिचार सहन करणार नाही, असा संकल्प करावा लागेल. मी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सदैव हिंदु जनजागृती समितीच्या समवेत आहे. मला जी काही सेवा दिली जाईल, ती मी अवश्य पूर्ण करीन, असे प्रतिपादन प्रसिद्ध ज्योतिषाचार्य अनिल वत्स यांनी केले.
हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने ज्योतिषाचार्य अशोक कुमार मिश्र आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तरित्या नुकतेच ‘ऑनलाईन ज्योतिष संघटन बैठकी’चे आयोजन केले होते. या बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि त्यासाठी आवश्यक प्रयत्न’ या विषयावर मार्गदर्शन केले. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ज्योतिष विषयामध्ये केलेले संशोधन उपस्थितांसमोर मांडले. बैठकीचे संचालन आणि प्रस्तावना ज्योतिषाचार्य अशोक कुमार मिश्र यांनी केली.
या बैठकीला ‘दिशा’चे संस्थापक ज्योतिषाचार्य राजेश तिवारी, ज्योतिषाचार्य डॉ. अजय आनंद, डॉ. भाविन देसाई, श्री. अर्जुन कुमार, श्री. राजीव खत्री, श्रीमती तृप्ती भट, श्री. विजय पाठक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारे आणि उत्तरप्रदेश अन् बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी उपस्थित होते.
हिंदु राष्ट्रासाठी मी सदैव हिंदु जनजागृती समितीच्या समवेत आहे ! – ज्योतिषाचार्य राघव स्वरूप भट्ट
भारताला घटनेनुसार हिंदु राष्ट्राची मान्य मिळावी ! – ज्योतिषाचार्य (डॉ.) धनेश मणि त्रिपाठी
केवळ सनातन धर्मच विश्वकल्याणाचा संदेश देतो. आपल्याला विश्वात शांती हवी असेल, तर हिंदु संस्कृतीचे पालन करणे अनिवार्य आहे, हे लक्षात घेऊन भारताला विश्वगुरु आणि हिंदु राष्ट्राच्या रूपात घटनेनुसार मान्यता मिळावी, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
पुढील ज्योतिष संमेलन ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर आयोजित करूया ! – ज्योतिषाचार्य डॉ. दलीप कुमार
हिंदु राष्ट्राचा विषय ऐकून मला अतिशय आनंद झाला. आपण या पुढील संमेलन ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर आयोजित करूया, असे मला वाटते.
ज्योतिषाचार्य अशोक कुमार मिश्र यांचा परिचयपाटणा (बिहार) येथील ज्योतिषाचार्य अशोक कुमार मिश्र ‘साऊथ एशियन अॅस्ट्रो फेडरेशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यासमवेतच ते ‘वर्ल्ड अॅस्ट्रो फेडरेशन’चे एशिया चॅप्टर चेअरमन आणि दक्षिण अशियायी ज्योतिष महासंघाचे राष्ट्रीय सभापती आहेत. यापूर्वी त्यांनी हिंदु जनजागृती समिती आयोजित उत्तर आणि उत्तर-पूर्व भारत हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये सहभाग घेतला होता. |
क्षणचित्र
ज्योतिषाचार्य अशोक कुमार मिश्र यांनी या बैठकीचे संचालन अतिशय नम्रतेने आणि आदरभावाने केले. या वेळी त्यांनी त्यांच्या संपर्कातील सर्व धर्मप्रेमींना समितीच्या कार्याशी जोडण्याची इच्छा व्यक्त केली. ज्योतिषाचार्य मिश्र यांच्या निमंत्रणाला मान देऊन व्यस्त दिनक्रमातही अनेक मान्यवर या बैठकीमध्ये सहभागी झाले. सर्वांनी ज्योतिषाचार्य मिश्र यांचा स्नेह आणि आदरभाव यांचे कौतुक केले.